‘गुलमोहर कॅश’ प्रकरणी पोलिसांनी हॉटेल टॉप लाईन येथील सीसीटीव्ही फुटेज केले जप्त

धुळे शहर

गुलमोहर कॅश प्रकणात धुळे पोलिसांनी आज विधिमंडळ अंदाज समितीने बैठका घेतल्या त्या हॉटेल टॉप लाईन येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.  त्या फुटेजची तपासणी चालू केली आहे. तसेच या प्रकणात अज्ञात व्यक्ती जी गुलमोहर रेस्ट हाऊसच्या 102 खोलीत मुक्कामी होती त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेले सीसीटीवी फुटेज च्या तपासणी आधारे पुढील तपास सुरू असून या करिता एक मीटिंग आज सकाळी घेण्यात आली.

तसेच होटल टॉपलाइन चे सीसीटीवी फुटेज जप्त केले . त्याची तपासणी चालू  आहे. सोबतच या प्रकणात दाखल गुन्ह्या मधे नमूद “एक अनोळखी” इसम याच नाव तपासात निष्पन्न केले आहे.
आता विधिमंडळ अंदाज समितीने बैठका घेतल्या त्या हॉटेल टॉप लाईन येथील सीसीटीवी फुटेज मधून नेमके काय पोलिसांच्या हाती लागते याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *