धुळे शहर
विषाचे इंजेक्शन देऊन निर्घृणपणे खून करण्यात आलेल्या पूजा बागुल हत्याकांड प्रकणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिच्या नराधम पती सोबतच सासू आणि प्रियसी सुद्धा सामील होते त्यांनी कट रचून एका मांत्रिकाला या हत्येची सुपारी दिली.
मांत्रिक आणि त्याच्या साथीदारांनी पूजाला मारण्यासाठी विषारी रसायन आणि इंजेक्शन, सलाईन आणले तसेच अल्पवयीन मुलांना सुद्धा यात गोवले गेले. पूजाला मारले जात असतांना तिची सासू मारेकऱ्यांना चहा पाणी विचारत होती. अशी संतापजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी मांत्रिकासोबतच त्याचे साथीदार आणि अल्पवयीन मुलाला ताहराबाद ता.सटाणा येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.
यात मांत्रिक भूषण बापू काळे, त्याचे साथीदार सचिन दौलत जाधव वय ३२, होम गार्ड धुळे, जयेश अनिल जगताप वय १९, आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर एक मुलगा अद्याप फरार आहे.
या प्रकरणी अटक आरोपी पती कपिल बागुल याची ओळख जादूटोणा करणाऱ्या भूषण बापू काळे याच्याशी झाली होती . हा काळे मांत्रिक असून लोकांना फसवून त्यांचे आजार इत्यादी बरे केल्याचा दावा करतो .
कपिल आणि त्याची आई या मांत्रिकाच्या घरात गेले आणि त्यांनी हा मंत्रीक आणि त्याचे साथीदार सचिन दौलत जाधव वय ३२, होम गार्ड धुळे, जयेश अनिल जगताप वय १९,बारावी नापास झाला आहे नुकताच तसेच अल्पवयीन मुले यांनी मयत पूजा ला मारण्याचा कट रचला. यात कपिलची आई पूजा ला लवकर मारले पाहिजे असा आग्रह करत होती .
या करिता प्रथम प्रज्ञा ने ५० हजार रुपये मांत्रिक भूषण च्या अकाउंट वर पे केले आणि कपिल ने १ लाख कैश या सर्वांना दिले . संपूर्ण मदत करण्या करिता ५ लाख ठरले होते.
२९ तारखेला जयेश जगताप वय १९ आणि २ अल्पवयीन आरोपी यांनी दुकानातून इंजेक्शन सलाईन आणि पेस्टिसाइड आणले . यांनी पती कपिल बरोबर पूजा ला इंजेक्शन सलाईन दिले आणि ते शेजारच्या रूम मधे तिघ पूजा मरण्याची वाट पाहत होते. तेव्हा कपिल बागुल च्या आरोपी आईने यांना चहा करू का हे पण विचारले !!! पूजा मेली आहे हे कन्फर्म झाल्यावर हे तिघे ही सर्व आणलेले सामान घेऊन तेथून निघून गेले. अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्वांना मोठ्या कौशल्याने पश्चिम देवपुर पोलिसांनी ताराबाद (सटाणा) वरून 5 जून रोजी पहाटे ताब्यात केली आहे. अजून एक अल्पवयीन मुलगा अजून फरार आहे.