धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे नकाणे तलावावर शोध बचाव प्रात्यक्षिक

धुळे जिल्हा

धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने नकाणे तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक संपन्न झाले.

मान्सूनपूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नकाणे तलाव येथे आर्टिलरी सेंटर, देवळाली कॅम्प, नाशिक येथील लेफ्टनंट मेजर श्री. कुलकर्णी, लेफ्टनंट मेजर श्री.जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणांची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांच्या निर्देशानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र, एसआरपीएफ मैदानावर एसआरडीएफ केंद्र आणि अक्कलपाडा धरण येथे प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. पाहणी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्याची तपासणी करण्यात आली. तसेच संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.


त्याचप्रमाणे नकाणे तलावावर राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. या प्रात्यक्षिकात पूर परिस्थितीत नागरिकांचे जलवाहनाने बचाव, प्राथमिक उपचार, शोध कार्य, तसेच बचाव साहित्य आणि तांत्रिक उपकरणांचा वापर याचे वास्तववादी सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक श्री. सोनवणे व त्यांचे टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *