महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची एकमेकांवर टोलवाटोलवी
जबाबदारी निश्चित करून कारवाई करा अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देणार – जिल्हा प्रमुख मनोज मोरे
धुळे शहर
धुळे शहरातील नकाणे रस्त्यावर रिया पेट्रोल पंपा जवळ बुधवार गुरुवार शुक्रवार असे सतत तीन दिवस मोठमोठे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चा भ्रष्टाचार खड्ड्यातून बाहेर आला असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शुक्रवारी रात्री जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यात उतरून रास्तारोको करीत जाब विचारला गेला.
या आंदोलना बद्दल माहिती देतांना शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, संपूर्ण देवपूर परिसराला खड्ड्यात घालण्याचे काम करणाऱ्या अत्यंत निकृष्ट दर्जाची प्रचंड भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भूमिगत गटार योजनेमुळे देवपूर परिसरातील नागरिकांना प्रचंड मरणयातना भोगाव्या लागल्या आणि अजूनही भोगतच आहेत. गेल्या आठवड्यात बेमोसमी झालेल्या पावसाने नकाणे रस्त्यावर रिया पेट्रोल पंपा जवळ बुधवार गुरुवार शुक्रवार असे सतत तीन दिवस मोठमोठे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चा भ्रष्टाचार खड्ड्यातून बाहेर आला. पाहिल्या दिवशी शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करत संबंधित यंत्रणेला सूचना देऊन दुरुस्ती करून घेतली. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर वीस मीटर पुढे अत्यंत जीवघेणा खड्डा पडला. तात्काळ स्पॉटवर धाव घेत शिवसेनेने संबंधित यंत्रणेला धारेवर धरून दुरुस्तीच्या सूचना केल्या ने तत्काळ रस्ता पुन्हा दुरुस्त केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणापासून काहीच अंतरावर तब्बल पाच बाय पाच चा अत्यंत जीवघेणा खड्डा पडल्याची माहिती देवपूर परिसरातील शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अजय पाटील व विभागप्तुरमुख तुषार सैंदाने यांनी दिल्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्हे तालुका प्रमुख अनिल जगताप मयूर बोरसे भटू गवळी,भूषण पाटील,प्रवीण वाडलेकर,राजू लोंढे,अरविंद सुडके,भटू भोपे,दतात्रय माळोदे,रवींद्र शिंदे,अमोल शिंदे, अक्षय भदाणे,श्रेयस सोनार,कुणाल मराठे,नितीन मोरे,टिनू साळुंखे,तेजस मराठे, यांनी स्पॉटवर जाऊन खड्ड्यात उतरून आंदोलन करत रास्तारोको करत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर पाचारण केले.
यावेळी अत्यंत गंभीर आणि बेजबाबदार उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले. या निकृष्ट कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले, महाराष्ट्र जीवन प्राधिकार्यांचे अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या कामापोटी आम्ही सार्वजनिक बांधकामला 43 लाख रुपये दिलेले आहेत, असे उत्तर देताना जबाबदारी झटकली.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी कोणीही घेतली नाही त्यामुळे शिवसेनेचे समाधान न झाल्याने तब्बल दोन तास रास्ता रोको केल्याने सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मानपाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन यास जबाबदार कोण हे निश्चित करण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले असून त्या बैठकीत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना भाग पाडेल, कारण शिवसेनेचे बांधिलकी जनतेस असून जनतेच्या प्रति चुकीचा वागणाऱ्यांना शिवसेना सोडणार असा धमकी वजा इशारा देत आंदोलन थांबवले आज सकाळी तात्काळ संबंधित ठिकाणी दुरुस्ती झाली असून लवकरच संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी म्हटले आहे.