भाजपा पश्‍चिम मंडल अध्यक्ष बंटी मासुळेंच्या पुढाकाराने जमनागिरी महादेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, महाआरती

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त
भाजपा पश्‍चिम मंडलतर्फे जमनागिरी महादेव मंदिरात 

मंडल अध्यक्ष बंटी मासुळेंच्या पुढाकाराने  स्वच्छता अभियान, महाआरती करीत पत्रक वाटप

धुळे शहर

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी (३०० वी) जयंती निमित्ताने धुळे शहर भाजपा पश्‍चिम मंडल तर्फे धुळे शहरातील पुरातन जमनागिरी महादेव मंदिर येथे काल सोमवार दि. २६ मे रोजी विशेष स्वच्छता मोहिम राबवत महाआरती आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवनपट माहिती पत्रक वाटप अभियान राबविण्यात आले.


भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष मा.रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल,संघटन महामंत्री मा.विजयजी चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभैय्या अग्रवाल, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला नेत्या सौ. अल्पाताई अग्रवाल, माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी सभापती सुनिल बैसाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शहर पश्‍चिम मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या पुढाकाराने शहरातील पुरातन जमनागिरी महदेव मंदिर येथे काल विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मंदिर आणि परिसर स्वच्छ करून तेथे भगवान महादेवांचा विशेष अभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी नागरीकांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवनपट माहिती पत्रक वाटप करण्यात आले.

यावेळी सौ. अल्पाताई अग्रवाल, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी सभापती सुनिल बैसाणे, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, सौ. योगिताताई बागुल, सौ. मंगलाताई पाटील, सौ. यमुनाताई जाधव, सौ.मंगला ताई नेरकर, माजी नगरसेवक संतोष खताळ, बन्सीलाल जाधव, पै. राजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागुल, निलेश नेमाणे, भिमाआप्पा उदीकर, सौ.सुनीताताई सोनार,सौ. निशाताई चौबे, सौ. अनुराधाताई पाटील, सौ. शंकुतलाताई चौधरी,शांताराम नेरकर, किशोरआप्पा सरकर, जिभाऊ पाटील, नानासाहेब जोशी, पंडीत मदने, पवन वाघ, किशोर गायकवाड, मुकेश थोरात, राज माने, चंद्रकांत भामरे, गोविंदा सोनवणे, लक्ष्मण चव्हाण, नितीन आखाडे, प्रशांत सूर्यवंशी, भटू गवळी, गोपाल रासकर, रामदास येवले, प्रदिप गायकवाड, आशाराम जाधव, दिपक बागुल, संतोष मराठे, दिगंबर पाटील यांच्यासह युवक परिसरातील भाविक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *