मुंबई
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबईत, ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेारिएंट पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच ठाणे येथे एका २१ वर्षीय तरुणाचा पहिलाच बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अर्थात, या रुग्णाचा मृत्यू हा पहिल्या व्हेरिएंटच्या काेराेनामुळे आहे की नविन हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून ठाण्यात रविवारी एकाच दिवसात ११ जण बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या ३० वर पाेहचली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका डाॅक्टरांनाही लागण झाली आहे. त्यांच्यासह एका गराेदर महिलेचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एक डाॅक्टर काेराेनाग्रस्त झाल्याने त्यांना विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येत आहेत. बाधित डाॅक्टर हे रुग्णालयाच्या आवारातच वास्तव्याला असून त्यांना अलिकडेच सौम्य लक्षणे जाणवली हाेती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी एकाच दिवसात काेराेना रुग्णांची संख्या ११ आढळली असून आतापर्यंत ३० जण बाधित झाले तर एका २१ वर्षीय बाधित तरुणाचा मृत्यू ओढवला आहे. नव्या काेराेनानंतर हा ठाण्यातील पहिलाच मृत्यू ठरला आहे.
रुग्णालयातील जे डाॅक्टर बाधित झाले त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीष्ठाता डाॅ. राकेश बाराेट यांनी दिली. बाधित डाॅक्टरांच्या संपर्कातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले जाणार नसून ज्यांना काेविडची लक्षणे किंवा ज्यांना काेणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल त्यांनाच विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. रविवारी डाेबिवलीतूनही एक रुग्ण ठाण्यात दाखल झाला असून अन्य एका बाधित गराेदर महिलेवरही उपचार सुरु आहेत. २२ मे राेजी रुग्णालयात दाखल झालेल्या २१ वर्षीय बाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी हाेती. त्याचा २४ मे राेजी मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार रविवारी बाधितांची संख्या ११ झाल्याने एकूण काेराेना बाधितांची संख्या ३० झाली. यातील सात जणांवर उपचार सुरु असून त्यातील एक छ. शिवाजी महाराज रुग्णालयात तर उर्वरित सहा जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तसेच गृह विलगीकरणातील २६ रुग्णांचीही प्रकृती स्थिर आहे.
…………………..
“प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना, ज्यांना फुफुस्याचा आजार आहे, अशा रुग्णांना नव्या व्हेरिएंटचा त्रास हाेत असल्याचे आढळले आहे.”
– डाॅ. अनिरुद्ध माळगावकर,
वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका