धुळे जिल्हा
धुळ्यातील ‘गुलमोहर कॅश’ प्रकरणात आज पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः आयकर विभागाच्या (income tax) वरिष्ठ अधिकारी जे पी स्वामी यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. तसेच पोलिसांतर्फे या प्रकरणी जबाब नोंदवली गेली आणि हे काम चालू आहे. यात बांधकाम विभागातील मंडळी, गुलमोहर विश्रामगृहातील स्टाफ, संबंधित लोकं यांचा समावेश आहे. सर्वांना इनरोगेट केले जात आहे.
तसेच पोलिसांनी गुलमोहर विश्रामगृहातील सर्व ६ सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. सीसीटीव्ही ची पाहणी आणि “एनालिसिस “ लवकरच केले जाणार आहे.त्यासोबत गुलमोहरचे दोन्ही आवक जावक रेजिस्टर जप्त करण्यात आले आहेत. इतर तांत्रिक तपास देखील पोलिसांकडून सुरू आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्राम गृह येथील १०२ क्रमांकाच्या कक्षातून जप्त करण्यात आलेले एक कोटी ८४ लाख रुपये अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समिती अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पाटील यांचे निलंबनही करण्यात आले आहे. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले असून मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.