धुळे शहरात 80 फूटी रोडवर गोडाऊनला भिषण आ
धुळे शहर
धुळे शहरातील 80 फूटी रोडवर असलेल्या नटराज टॉकीज जवळील भंगाराच्या गोडाऊनला आज सायंकाळी भिषण आग लागली .
आगीचा भडका उडून आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट उंच जात असल्याने परिसरात एकच खळबळ आणि भीतीचे सावध पसरले.
घटनेची माहिती मिळतात धुळे महापालिकेचे अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.
आग मोठी असल्याने पाच ते सहा बंब द्वारे विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नटराज टाकी परिसरात आग बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी केली गर्दी झाली.
आग कशामुळे लागली अद्याप अस्पष्ट असून आगीत लाखोंचे साहित्य झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.